Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल महाविद्यालयात क्रॉस कंट्री स्पर्धा

यावल प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित जळगाव संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विभागीय आंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

याप्रसंगी  प्रा. चंद्रकांत डोंगरे सचिव जळगाव विभाग क्रीडा समिती हे उद्घाटक होते तर अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांनी भूषविले.

मैदानाची विधीवत पूजा करून प्रा. डोंगरे यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी निवड समिती सदस्य डॉ. पी. आर .चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून स्पधेंची नियमावली सांगितली .अध्यक्ष डॉ. संध्या सोनवणे यांनी प्रतिपादन केले की शारीरिक विकास करण्यासाठी खेळ गरजेचा आहे .स्पर्धेत भाग घेऊन त्यात प्राविण्य मिळवता येते त्यातून करिअर घडवता येते .

सदर स्पर्धेत प्र . प्राचार्य किशोर पाठक यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धा सुरू केल्या .या स्पर्धेत मुलींमध्ये प्रथम सहा व मुलांमध्ये प्रथम सहा स्पर्धकांची विभागीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेत तेरा महाविद्यालयातील संघ सहभागी झाले होते.यात एकूण १६ मुली व३९ मुले स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला. संघ प्रमुख म्हणून डॉ. वीरेंद्र जाधव, डॉ. महेश पाटील ,डॉ. अमोल पाटील, प्रा. राजेंद्र भालोदकर , विनायक पाटील, वसंत सोनवणे ,प्रा. सुभाष वानखेडे ,प्रा  उमेश पाटील व डॉ. मारतळे उपस्थित होते .

क्रीडा स्पर्धेचे आयोजन क्रीडा समिती प्रमुख डॉ.पी.०ही .पावरा व उपप्राचार्य प्रा . ए. पी .पाटील यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. सुधा खराटे यांनी केले तर आभार प्रा. एम.डी  खैरनार यांनी मानले. स्पर्धा यशस्वितेसाठी डॉ.एस.पी कापडे, प्रा. संजय पाटील, प्रा. एस.आर. गायकवाड, डाॅ. एच जी. भंगाळे, डॉ. आर.डी. पवार, प्रा.मुकेश येवले, प्रा. मनोज पाटील, मिलिंद बोरघडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

Exit mobile version