Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

साकळी येथील व्यवसायिकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । लघुशंके करीता थांबलेल्या बांधकाम व्यवसायिकेचा हृदय विकाराचा तीव्र झटकाने जागीच मृत्यु झाल्याची घटना हिंगोणा गावाजवळ घडली आहे. दरम्यान, ते चारचाकी वाहनाने फैजपूर येथे जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

याबाबत सुत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील साकळी येथील बडगुजर गल्लीतील रहिवासी  रूपसिंग गुलाबसिंग बडगुजर (वय ६३) हे गुरूवारी त्यांच्या स्वत:हाच्या चार चाकी वाहनाने फैजपूर येथे जात असतांना दरम्यान हिंगोणा गावाजवळ त्यांनी लघुशंके करीता वाहन थांबवले व खाली उतरले असता त्यानी ह्रदय विकाराचा तिव्र झटका आला व त्यात ते जागीचं मरण पावले. या बाबतची संपुर्ण माहीती फैजपूर पोलिसांना  देण्यात आली असता फैजपूर तालुका यावल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर अखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार हेमंत सांगळे, पोलीस नाईक महेंद्र महाजन, योगेश दुसाने, अरुण नमायते हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तातडीने मयताचे मृतदेह यावल ग्रामिण रूग्णालयात आणला.

घटनेचे वृत्त कळताच साकळी व परिसरातील नागरीकांनी येथील ग्रामीणरुग्णालयात मावळते जिल्हा परिषदेचे शिक्षण, क्रिडा व आरोग्य सभापती रवींद्र  पाटील (छोटू भाऊ ), पंचायत समितीचे मावळते सदस्य दिपक अण्णा पाटील, जितेंद्र महाजन , योगेश खेवलकर, तुकाराम महाजन, अ. बडगुजर, नुतन बडगुजर,  बडगुजर सह मोठ्या प्र साकळी येथील नागरिक दाखल झाले होते. बडगुजर यांच्या मृत्यु पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना,नातवंडे असा परिवार असुन त्यांच्या अशा आकस्मात मृत्यूमुळे गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version