Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल भाजप युवा मोर्चाची कार्यकारणी जाहिर

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील शहर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाची तालुका अध्यक्ष सागर कोळी यांच्या नेतृत्वाखालील इतर नुतन पदाधिकारी यांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली

शहर उपाध्यक्षपदी शेखर बाविस्कर आणि मनोज बारी यांची सरचिटणीसपदी सिद्धांत घारू सोहन कोळंबे व शहर चिटणीसपदी अश्वजित सिसोदिया यांची तर आयटी सेलच्या शहरप्रमुखपदी प्रथमेश घोडके यांची निवड करण्यात आली आहे . भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या नुतन पदाधिकारी यांचे पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपुत, माजी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक नारायण चौधरी, ओबीसी चे जिल्हा उपाध्यक्ष बाळु फेगडे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राकेश फेगडे, यावल पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, अखिल भारतीय सरपंच परिषदचे जिल्हा अध्यक्ष पुरुजीत चौधरी, पंचायत समितीचे उपसभापती योगेश भंगाळे आदींनी त्यांचे स्वागत केले आहे

 

 

Exit mobile version