शुक्रवारपासून माहेजी देवीच्या यात्रेस प्रारंभ

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पाचोरा शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या व जळगाव जिल्ह्यात प्रशिद्ध असलेल्या माहेजी देविच्या यात्रेस शुक्रवार ६ जानेवारी पासून सुरवात होणार आहे.

 

माजी खा. ए. टी. पाटील यांच्या प्रयत्नातून तार्थक्षेत्र विकास योजनेतून सुमारे सव्वातीन कोटी रुपये मंजूर झाले. माजी खासदार ए. टी. पाटील यांचे हस्ते महाआरती करण्यात येणार आहे. व त्यानंतर संपूर्ण गावातून देविच्या मुर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात येईल. १५ यात्रा सालाबादप्रमाणे १५ दिवस भरणार असून देविची सेवा करण्याचा मान येथील भगत कुटुंबाकडे असल्याने एक एक वर्ष आदलून बदलून या कुटुंबातील एक सदस्य सेवा देतात यावर्षी रविंद्र भगत यांचे कडे हा मान आलेला आहे.

माहेजी देवी बाबत अशी अख्यायिका आहे की,  या गावात एक इनामी जमिन असून पुर्वी माहेजी गावात मुनसीपालिटी असल्याचा शिलालेख आढळून आलेला आहे. यात्रेत पुण्यस्लोक अहिल्याबाई होळकर यांनी भेट दिल्याचा इतिहास असून यात्रेत पुर्वी मोठ्या प्रमाणात घोड्यांची विक्री होत असल्याने अहिल्याबाई होळकर ह्या देविच्या दर्शनासाठी व घोडे खरेदी करण्यासाठी येत असत. नवसाला पावणारी माय अशी ख्याती असलेल्या या शंखभरी देविच्या यात्रोत्सवाला विशेष महत्त्व आहे. पुर्वी माहेजी गावाचे नाव चिंचखेडा असे होते. सव्वा तिनशे वर्षांपूर्वी बोरनार येथील सासर असलेल्या वेडगळ समजून गावाबाहेर काढून दिलेल्या सासरच्या जाचास कंटाळलेल्या एक महान स्त्री चिंचखेडा या गावी आली. गावातील लहान बालकांनी तीला चिडवायला व त्रास देण्यास सुरुवात केली. यावेळी त्या स्रिने दैवी शक्तीने त्या मुलांना मुच्छीत केले. या प्रकाराने भांबावून गावातील नागरीकांनी शरण येवून क्षमा याचना करत मुलांना पर्वत करण्याची विनंती केली. देवीने मुलांना पुर्वत करून दैवी शक्तीची प्रचिती दिली व गावात काही दिवस निवास केल्यानंतर चिंचखेडा गावात समाधी घेणार असल्याचे सांगितले. व स्वतः हुन अग्नीदहन करून घेतले त्याच ठिकाणी सेंदूराचे बाण निघाले गावकऱ्यांनी त्याच जागेवर मुर्तीची प्रतिष्ठापना केली. या माय देविच्या नावावरुन चिंचखेडा गावाचे नाव मायजी (माहेरी) बनले. व यात्रा भरण्यास सुरुवात झाली.

यात्रा सतत १५ दिवस चालत असून याठिकाणी जिल्हा भरातून भाविक कबुल केलेले नवस फेडण्यासाठी येत असता यात्रेत, विविध प्रकारचे खेळणे, पाळणे, भांड्यांची दुकाने, गृह उपयोगी वस्तू, करमणूकिचे साधने येत असल्याने यातून लाखो रुपयांची उलाढाल होते. माजी खासदार ए. टी. पाटील यांच्या प्रयत्नातून तिर्थक्षेत्र विकास योजनेतून सव्वा तीन कोटी रुपये मंजूर झाल्यानंतर याठिकाणी भव्य सभामंडप, रस्त्यांचे कांक्रेटिकरण, लाईट, स्नान गृह शौचालयाची व्यवस्था झाल्याने परीसर सुशोभीकरणामूळे रमणीय वाटू लागला आहे.

Protected Content