Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कळमसरेत उद्या भवानी मातेची यात्रा

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरे येथील ग्रामदैवत असलेल्या भवानी मातेची उद्या दि.9 रोजी यात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ही यात्रा दरवर्षी पाडव्यानंतर दुर्गा अष्टमीला साजरी केली जाते.

गावाच्या दक्षिणेला लहान भवानी मातेचे मंदिर असून गावाच्या पच्छीमेला शहापुर रसत्यावर गावापासुन दोन किलोमीटर अंतरावर मोठ्या भवानी मातेचे मंदिर आहे.हा यात्रोत्सव लहान भवानी मातेच्या मंदिर परिसरात भरविला जातो.या यात्रोत्सवाला सुमारे  दीडशे वर्षाची परंपरा असून नवस फेडीसाठी  मोठी गर्दी होत असते.भवानी मातेचा यात्रोत्सव एक दिवसाचा असला तरी व्यवसाय नोकरी तसेच कामानिमित्त बाहेर गावी असणारे आप्तेष्ट भाऊबंदकी या यात्रेनिमित्त गावाला एकत्र येऊन मनोभावे दर्शन घेत असतात.

माळी समाजाचा सामूहिक नवस फेडीचा कार्यक्रम 

कोरोना महामारीमुळे दोन वर्षापासून बंद असलेली यात्रा होत असल्याने गावात नवस फेडीसाठी मोठी संख्या असल्याने.कळमसरे येथील रहिवासी सूरत येथील माळी समाजाचे अध्यक्ष , सुरत येथील नगरसेवक  सुधाकर चौधरी, त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका दक्षाताई चौधरी यांनी गावातील माळी समाजाच्या सामुहिक नवस फेडण्याच्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. यावेळी सामूहिक नवस फेडुन गावासह परिसरातील पाच हजार  भाविकाना  महाप्रसादाचा कार्यक्रमाचे आयोजन श्री सुधाकर चौधरी व त्यांची पत्नी दक्षाताई चौधरी यांनी स्वखर्चाने केले आहे.

दरम्यान भवानी मातेच्या मंदिरावर विद्युत रोशनाई करण्यात आली असून गावात उपहारगृहे, पाळना, खेळन्याची दुकाने आधीच दाखल झाली आहेत. रात्री लोकमनोरंजनासाठी सुकलाल बोराडीकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात आले आहे. गावात ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी स्वछता, सुरळीत विजपुरवठा याबाबत दक्षता घेतली आहे. यात्रे दरम्यान शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायत कळमसरेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

Exit mobile version