Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कामगारांच्या मागण्यासंदर्भात संचालक मंडळाचे लेखी आश्वासन

फैजपूर प्रतिनिधी । मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या कामगार वर्गाच्या विविध मागण्या संदर्भात ‘वंचित बहुजन आघाडीच्या’ नेतृत्वात आज ठिय्या आंदोलन केले गेले त्यास संचालक मंडळातर्फे सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून कामगारांच्या मागण्या लवकरच पूर्ण करू, असे संचालक मंडळाने लेखी आश्वासनात म्हटले आहे.

या बाबत वृतांत असा कि, न्हावी मार्ग फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना हा गेल्या कित्येक दिवसांपासून बंद पडलेला आहे त्यामुळे कामगार वर्गाचा रोजगार गेला. त्याचा सुमारे चाळीस महिन्यांचा पगार थकीत आहे अश्यातच करोना महामारीने कामगार वर्गाचे आणखीच हाल झाले होते. संचालक मंडळ कामगाराचे पीएफची रक्कम सुद्धा नाशिक कार्यालयात भरत नव्होती. सेवा निवृत्त कर्मचारी याची देणी ही थकीत आहे. या सर्व बाबी साठी कामगारवर्ग सतत पाठ पुरावा करत आला असला तरी कारखाना प्रशासना कडून मात्र कोणती ही ठोस पावले उचलली जात नव्होती. 

कामगारवर्ग  मग आपल्या न्याय मागण्या मिळवून द्याव्या अशी विनंती करत विनोद सोनवणे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्या कडे गेला व नेहमी प्रमाणे वंचित , शोषित,पीडित ,कामगार वर्गाच्या हाकेला धावून जाणारे विनोद सोनवणे यांनी कामगारवरर्गाला धीर देत त्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार केला होता. याआधी पक्षा तर्फे कारखाना प्रशासना कडे कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्या संदर्भात निवेदन दिले होते मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आज २१ जून रोजी सकाळी दहा वाजता कारखान्याचे चेअरमन यांच्या निवासस्थानी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते त्यास प्रतिसाद देत संचालक मंडळा तर्फे कामगार वर्गाच्या मागण्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडून लवकरच पूर्तता करू असे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. या बाबत बोलताना विनोद सोनवणे यांनी सांगितले कि जो पर्यंत कामगार वर्गाच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही तो पर्यंत शांत बसणार नाही.

सदर आंदोलन विनोद सोनवणे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी व मनोज कापडे यावल तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वात पार पडले याप्रसंगी प्रमोद इंगळे जिल्हाध्यक्ष जळगांव पश्चिम, दिनेश इखारे जिल्हा महासचिव, मनोज कापडे यावल तालुकाध्यक्ष, बाळु शिरतुरे रावेर तालुकाध्यक्ष, दिपक मेघे जिल्हा सचिव, रफिक बेग जिल्हा उपाध्यक्ष, सचिन बाऱ्हे जिल्हा I T प्रमुख, बालाजी पठाडे चिटणीस कामगार आघाडी, भगवान मेघे यावल तालुका उपाध्यक्ष,छोटु गवळी यावल तालुका महासचिव, सोनु वाघुळदे फैजपुर शहराध्यक्ष, विद्यासागर खरात, देवदत्त मकासरे, बंटी सोनवणे,कांतिलाल गाढे रावेर तालुका महासचिव, कुणाल सुरडकर,विनोद तायडे, अर्जुन वाघ, सुरेश अटकाळे, गोलु अवसरमल, संम्यक इंगळे, अजय तायडे उपस्थित होते. तर कामगार गिरीष कोळंबे युनियन माजी अध्यक्ष, दामोदर कोळंबे माजी युनियन उपाध्यक्ष, योगेश होले युनियन खजिनदार, कामगार कुमार पाटिल, हमीद शाह, वसंत चौधरी, अरुण पाटिल, मनमोहन महाजन, भानुदास पाटिल, पुंडलिक माळी, जिवन फेगडे, शरद जावळे, राजेंद्र सोनवणे, सुनील अडकमोल, सुनील कोष्टी, संजय कोलते, सह असंख्य कामगारांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले

Exit mobile version