Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अरे व्वा : रूग्णवाहिकांना मिळणार मोफत पेट्रोल आणि डिझेल (व्हिडिओ )

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा आणि भडगाव तालुक्यासह परिसरातील कोरोना रूग्णांची ने-आण करणाऱ्या रूग्णवाहिकेसह ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना आता मोफत पेट्रोल-डिझेल मिळणार आहे. खासदार उन्मेश पाटील यांच्या उपस्थितीत या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली.

या उपक्रमासाठी रिलायन्स इंडसट्रिज लिमिटेड व पाचोरा येथील रिलायन्स पेट्रोल पंप चे संचालक रुपेश शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. रिलायन्स पेट्रोलपंप पाचोरा यांच्या माध्यमातून आता कोरोनाग्रस्त रुग्णांना ने-आन करणाऱ्या खाजगी व शासकीय रुग्णवाहिकांना व ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या वाहनांना प्रति दिन प्रती वाहनास ५० लिटर मर्यादेपर्यंत पेट्रोल किंवा डिझेल रिलायन्स पेट्रोल पंप, पाचोरा येथे मोफत टाकून मिळणार आहे. याकरिता रुग्णवाहिकांना व अत्यावश्यक वाहनांना तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी याचे साक्षांकित पत्र घेणे आवश्यक आहे. 

या उपक्रमाची सुरुवात खासदार उन्मेष पाटील, कृउबा समितीचे माजी सभापती सतिष शिंदे, उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. याप्रसंगी खासदार पाटील यांनी रुपेश शिंदे यांचे भरभरून कौतुक करून या उपक्रमामुळे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत याचा लाभ होईल व गरजू रुग्णांना कमी खर्चात इतर ठिकाणी जाऊन उपचार घेता येईल असे सांगितले. भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी रुग्णवाहीका चालकांना करोना व्यक्ती साठी भाडे कमी आकरण्याचे आवाहन केले. तसेच सुरु केलेल्या ह्या उपक्रमाचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांना लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी कटिबद्ध राहू असे रुपेश शिंदे यांनी बोलताना सांगितले व रिलायन्स कंपनीचे (सी. ई. ओ.)  मुकेश अंबानी यांचे आभार मानले.

याप्रसंगी जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, शहराध्यक्ष रमेश वाणी, नगरसेवक योगेश पाटील, पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंके, भडगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील, भडगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज जाधव, भाजपा सरचिटणीस गोविंद शेलार संजय पाटील आदी उपस्थित होते.

 

 

Exit mobile version