Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फायनानंशाल एनालिस्टवर आयएमआरमध्ये कार्यशाळा उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  केसीई संस्थेच्या इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्च आणि स्कीलएज, मुबई यांच्या संयुक्त विद्यमाने एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी फायनानंशाल मैनेजमेंट मध्ये करिअर कसे करावे, त्या विभागात नोकरी कशी मिळवावी, त्यासाठी कशी तयारी करावी आणि फायनानंशाल एनालिस्ट कसे बनावे ह्यावर एक ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली.

 

ह्या कार्यशाळेला मुंबईचे सीए अंकित बजाज ह्यांनी मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. ह्या कार्यशाळेला एकूण ९५ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेची सुरुवात बजाज ह्यांनी फायनानंशाल एनालिस्टसाठी कुठल्या स्किल्स लागतात, त्या कश्याप्रकारे साध्य कराव्यात, त्यासाठी कुठली पुस्तके वाचावीत, कशी तयारी करावी,  त्यासोबत ह्या नोकरीसाठी कसले प्रश्न विचारले जातात, नोकऱ्या कधी निघतात, त्यांना अप्लाय कसे करावे आणि इंटरव्यू कसा द्यावा ह्याची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. ह्या कार्यशाळेला संचालिका प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे ह्यांनी मार्गदर्शन केले तर प्रास्ताविक ट्रेनिंग एंड प्लेसमेंट हेड प्रा. पुनीत शर्मा ह्यांनी केले.

Exit mobile version