Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘डिजिटली कंट्रोल्ड पॉवर कनवर्टर’वर कार्यशाळा

जळगाव प्रतिनिधी । एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि एआयसीटीइ न्यू दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “डिजिटली कंट्रोल्ड पॉवर कनवर्टर फॉर इंडस्ट्रियल अँड रिन्यूएबल अँप्लिकेशन्स” या विषयावर १४ ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. हि कार्यशाळा इलेकट्रोनिक्स अँड टेलेकॉम्युनिकेशन व इलेकट्रीकल विभागातर्फे आयोजित करण्यात अली आहे.

सध्याच्या  कॉवीड-१९ च्या पार्श्वंभूमीवर संशोधनाला गती देण्यासाठी  एआयसीटीइ न्यू दिल्ली द्वारा तीन कार्यशाळेला संमति देण्यात आली आहे. त्यातील तृतीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे मुंबई आयआयटीचे डॉ. चेतनसिंग सोलंकी यांच्याहस्ते करण्यात आले, प्राचार्य प्रा. डॉ. के. एस. वाणी, उपप्राचार्य प्रा. डॉ. संजय शेखावत,  कार्यक्रमाचे समन्व्यक डॉ. पी. जे. शाह, डॉ. एस. आर. सुरळकर,  श्री. व्ही एस पवार, डॉ. पी. व्ही. ठाकरे आदी उदघाटन प्रसंगी उपस्थित होते.

या कार्यशाळेशेमध्ये  देशातील  उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र  अशा  विविध राज्यातून ८० प्राध्यापक तसेच संशोधन स्नातक यांनी  सहभाग नोंदवला आहे.

हे  तांत्रिक व्याख्यान  आधुनिक संशोधनासाठी  खूप मोलाचे ठरणार आहे. तसेच ऑनलाईन प्रात्यक्षिक नॅशनल इन्फोटेक सुरत यांच्या प्रयोगशाळेतून घेण्यात येत आहे.

ह्या  कार्यशाळेचे यशस्वी आयोजनासाठी इलेकट्रोनिक्स व टेलेकॉम्युनिकेशन विभागप्रमुख डॉ. एस. आर. सुरळकर,  इलेकट्रीकल विभागाचे प्रमुख व्ही एस पवार, कार्यक्रमाचे समन्व्यक डॉ. पी जे शाह , डॉ. पी व्ही ठाकरे, प्रा. अमोल वाणी, प्रा. धनेश पाटील, प्रा. निलेश महाजन, डॉ. पी. एच. झोपे, प्रा. सतपाल राजपूत  श्री. योगेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

 

Exit mobile version