Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इकरा थीम महाविद्यालयात क्रीडा विभागातर्फे कार्यशाळा उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । इकरा शिक्षण संस्था संचालित एच जे थीम महाविद्यायातील आयक्यूएसी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक सांस्था करता “शासना चा क्रीडा विषयी विविध योजना विषयी माहिती ” या एक दिवसीय कार्यशाळा  आोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अब्दुल करीम सालार होते. प्रमुख पाहुणे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित, क्रीडा अधिकारी एम. के. पाटील, अरविंद खांडेकर, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. इकबाल शाह, सचिव एजाज अब्दुल गफार मलीक, डॉ. ताहेर, अब्दुल अजीज सालार, डॉ. जबिउल्ला शाह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची  सुरवात कुराण पढनाने प्रा. डॉ.अख्तर शाह यांनी केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. वकार शेख यांनी केले.

कार्यक्रमात दिपप्रज्वलन करून उद्घाटन मिलिंद दिक्षित यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी शासनाच्या क्रीडा विषयी अनुदानास पात्र कोण होऊ शकतो? प्रस्ताव कसे सादर करावे? याचा बद्दल माहिती दिली.  एम.के. पाटील यांनी क्रीडा अनुदानासाठी लागणारे प्रस्ताव बद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर प्राचार्य डॉ. सय्यद शजाअत अली यांनी आपले मत व्यक्त केले. त्यानंतर प्रश्नोत्तरेचा भाग आला त्यात ,मिर्झा इकबाल, रहीम रजा सर, अब्दुल रहीम सर, हनीफ खान सर, यांनी आपले प्रश्न मांडले. त्यांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले.

या कार्यक्रमात जळगाव जिल्हा येथील प्राथमिक शाळा व विद्यालय येथील, संस्था चालक, मुख्याध्यापक, यांची  उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशसवीतेसाठी प्रा.पिंजारी,डॉ.युसुफ पटेल, डॉ अमीन काझी, डॉ.इरफान, डॉ राजेश भामरे, डॉ. तनवीर खान यांनी परिश्रम घेतले. आभारप्रदर्शन प्रा. साजिद मलक यांनी केले.कार्यक्रमात उपस्थिती सहभागी यांना प्रमाण पत्र प्रदान करण्यात आले.या वेळी महाविद्यालया चे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Exit mobile version