Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सैन्य कॅन्टीनमध्ये नौकरीच्या बहाण्याने तरुणांना गंडवल्याची तक्रार (व्हीडीओ)

e7b91827 c79c 4696 9874 bbe8455df8df

जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील पाच वर्षाचा हिशोब द्यायला आणि जनतेचा आशीर्वाद घ्यायला जळगावात येताय. परंतू तत्पूर्वी सैन्याच्या कॅन्टीनमध्ये नौकरी लावून देण्याच्या बहाण्याने एका कंपनीने गंडविल्याची धक्कादायक तक्रार समोर आली आहे. पिडादाई म्हणजे पिडीत तरुणांनी मागील आठ दिवसापासून जेवण सुद्धा केलेले नाही. विशेष म्हणजे मागील महिन्यात एका तरुणाने अशाच नैराशातून आत्महत्या केली होती. परंतू तरी देखील संबंधित कंपनीवर कुठलीही कारवाई झालेली नव्हती. दरम्यान, या तरुणांना नगरसेवक प्रवीण कोल्हे यांनी आधार देत जेवण खाऊ घालत आधार दिलाय.

 

आजच्या घडीला देशातील बेरोजगारी मागील ४५ वर्षाच्या रेकॉर्ड स्तरावर आहे. जळगावातील खेडी परिसरात मूळ दिल्लीची असलेली ग्लेझ नामक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कार्यरत आहे. या कंपनीची नारायणी अॅसेट नामक उपशाखेने आम्हाला सैन्याच्या कॅन्टीनमध्ये नौकरी लावून देण्याच्या बहाण्याने गंडविल्याचा आरोप सोलापूर येथील चार तरुणांनी केलाय. अक्षय सदाशिव शेडगे, गणेश महादेव काकडे,प्रतिक वसंत साळुंखे, सागर वंसत सोनमुळे (चौघं. रा. माळशिरस जि.सोलापूर) या तरुणांना सैन्याच्या कॅन्टीनमध्ये नौकरी लावून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यासाठी प्रत्येकाकडून १२ हजार रुपये घेऊन आणखी लोकांना कंपनीसोबत जोडल्यास गुण वाढतील व तुम्हाला आर्थिक फायदा होईल, असे सांगण्यात आले होते.

 

नौकरी लावून देतांना या तरुणांना तुम्हाला प्रशिक्षण दिले जाईल. एवढेच नव्हे, तर राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कंपनी करेल, असे सांगण्यात आले होते. परंतू मागील तीन महिन्यापासून या चौघं तरुणांना घराच्या बाहेर सुद्धा निघू देण्यात आले नव्हते. या तरुणांना मार्केटिंगचे काम देण्यात आले होते. मागील आठ दिवसापासून हे चौघं तरुणांना जेवण सुद्धा देण्यात आले नव्हते. त्यामुळे ही मुलं उपाशी राहत होती. इकडून तिकडून पैसे जळवून त्यांनी बिस्किटांवर दिवस काढले. मात्र, त्रास असह्य झाल्यावर त्यांनी खेडी प्रभागातील नगरसेवक प्रवीण कोल्हे यांच्याशी संपर्क साधला. श्री. कोल्हे यांनी या तरुणांच्या जेवणाची व्यवस्था केली. तसेच कंपनीचे सुपरव्हायझर श्री. पंडित यांच्यासोबत भेट घेत. तरुणांचे पैसे परत करण्याची विनंती केली.

 

ना. फडणवीस भुसावळमार्गे ज्या रस्त्याने जळगावात प्रवेश करतील. त्याच रस्त्यावर खेडी पेट्रोल पंपाच्या जवळ अनेक तरुण सैन्याच्या कॅन्टीनमध्ये नौकरी लावून देण्याच्या बहाण्याने एका कंपनीने गंडवल्याची तक्रार आहे. मागील आठ दिवसापासून उपाशी असलेली बेरोजगार तरुण आजच्या घडीला आत्महत्येच्या मार्गावर आहेत. एकाने मागील महिन्यात आत्महत्या केल्याचे उदाहरण ताजेच आहे. ना.फडणवीस आपल्या भाषणात त्यांच्या कार्यकाळाचा हिशोब देतील, जनतेचा आशीर्वाद घेतील. पण या पिडीत बेरोजगार तरुणांची केवीलवाणी हाक त्यांच्यापर्यंत पोहचेल का? हाच खरा प्रश्न आहे.

 

Exit mobile version