मधुकर सहकारी साखर कारखानातील कामगार न्याय हक्कासाठी मैदानात

यावल प्रतिनिधी । न्हावी मधुकर सहकारी साखर कारखानातील कामगारांनी न्याय हक्क मिळावा, या दृष्टीने सर्व पक्षीय व संबंधित लोकप्रतिनिधींकडे अडचणींबाबत सांगितले असून कोणीही न्याय मिळवून देऊ शकले नाही. यामुळे आता सर्व कामगार न्याय हक्कासाठी मैदानात उतरतील, असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विनोद सोनवणे व यावल तालुका अध्यक्ष मनोज कापडे यांना मागणीव्दारे सांगितले आहे. 

न्हावी मधुकर सहकारी साखर कारखाना येथील काम करणारे कामगार यांना त्याच्या हक्काचे पि.एफ व इतर मानधन मिळत नसुन त्यांनी लोकप्रतिनिधी आमदार, खासदार, भारतीय जनता पार्टी, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, ह्या पक्षाला वेळोवेळी न्याय मागितलर. तरी देखिल या पक्षाचे जिल्हात आमदार, खासदार असुन या गोर गरिब कामगारांना त्यांच्या हक्काचे पि.एफ व मानधन मिळवून देऊ शकले नाही.

मधुकर सहकारी साखर कारखाना येथील कामगार यांना आपल्याला न्याय हक्क  आता फक्त वंचित बहुजन आघाडी मिळवून देणार हे लक्षात आले सर्व कामगार यांनी न्हावी येथे बैठक आयोजित  केली व बैठकित वंचित बहुजन आघाडीचे  जळगाव जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे, यावल तालुका अध्यक्ष मनोजभाऊ कापडे, आय.टी जिल्हा प्रमुख सचिनभाऊ बा-हे, जिल्हा सचिव दिपक मेघे, देवदत्त मकासरे (मेजर) व यावल तालुका सघटक रोहित भाऊ अडकमोल यांना आमंत्रीत केले व कामगार यांनी आपले अडचणी मांडले.

कामगार यांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी सदैव आपल्या सोबत आहे आहे आपल्याला लवकर न्याय मिळवून देणार व आपले अडचणी वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या पर्यंत पोचणार व सर्व कामगार यांची भेट ॲड.बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या करून कामगार यांच्या अडचणी वर मार्ग काढणार अशी ग्वाही वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष विनोद सोनवणे व यावल तालुका अध्यक्ष मनोज कापडे यांनी दिली. बैठकीमध्ये कुमार पाटिल, हमीद शाह, गिरीष कोळंबे, कुंदन जावळे, दामोदर कोळंबे, मोहन पाटील, संजय वायकोळे, सारंग मंदवाडे, सुधीर राणे, विजय चौधरी, सचिन बोंडे, सुनील कोलते, सह सर्व समाज बांधव व बहुजन कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकित सुत्रसंचालन, आभार प्रदर्शन हमिद शहा बिस्मिल्ला शहा यांनी केले.

 

Protected Content