Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव जिल्ह्यातील कामगारांना मिळणार आरोग्यकवच – खासदार उन्मेषदादा पाटील

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कामगारासाठी रुग्णालय असलं पाहिजे याची मागणी कामगारकडून होत होती. आज १०० बेडचं कामगार कल्याण रुग्णालय मंजूर झालं असून त्याला लवकरच जागा उपलब्ध करून देत या रुग्णालाचा शुभारंभ होईल. असं सांगत खासदार उन्मेषदादा पाटील यांनी आज ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी संवाद साधतांना सांगितलं.

कामगार कल्याण रुग्णालय संदर्भात सांगताना खासदार उन्मेषदादा पाटील म्हणाले की, “जळगाव जिल्ह्यासाठी आणि विशेषता संस्कार जोपासणारे कामगारांसाठी एक अत्यंत आनंदाची बाब म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कामगारासाठी रुग्णालय असलं पाहिजे याची मागणी कामगारकडून होत होती. उद्योग घटकांकडून होती. उद्योजकांच्या संस्था असोसिएशन यांची होती विशेषता भारतीय मजदूर संघाच्या सहकाऱ्यांची होती.

या सगळ्या संदर्भात मधल्या काळामध्ये जे आपले श्रम व रोजगार मंत्र्यांशी संपर्क साधून त्यांना आपण भेटून निवेदन दिले आणि विनंती केली की जळगाव येथील आता उद्योगांमध्ये पुढे जात आहे. कात टाकत आहे आणि उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या समाज, संस्कार जोपासणाऱ्या कामगारांना देखील आरोग्याचचं कवच असलं पाहिजे. सुविधा असली पाहिजे. आपण बघितलं की गावाबाहेरच्या कृपा करून ट्रीटमेंट घ्यायला जावं लागायचं खासगी संस्थेच्या मदत घ्यावी लागायची.

‘नॅशनल हेल्थ मिशन’ मधून मागच्या दोन महिन्यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने तीस कोटी रुपयांच्या निधीतून गर्भधारणेपासून ते गर्भधारणेनंतर लसीकरणाच्या बाबी होतात; असं १०० बेडचं महिला बाल संगोपन केंद्र अद्यावत रुग्णालयाची सुरुवात झाली. आज १०० बेडचं कामगार रुग्णालय मंडळ मंजूर झालं आहे. त्याला तर लवकरच जागा उपलब्ध करून देऊ. एमआयडीसीमध्ये शक्य तो प्रयत्न असेल. मग या रुग्णालाचा शुभारंभ होईल. आरोग्य यंत्रणा मजबूत होत आहे. पाडळसेसारखा प्रकल्प राज्याचा प्रस्ताव राज्याची मंजुरी नसल्यामुळे केद्राला पैसे देता येत नव्हते. असे अनेक जण विकास प्रकल्प रखडले आहेत. आरोग्य आणि सिंचन याला गती मिळेल.” याचा आनंद असल्याचं खासदार उन्मेषदादा पाटील यांनी सांगितलं.

Exit mobile version