Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कार्यकर्तेच खरे पक्षाचे आधारस्तंभ : ना.जावळे

raver melava

रावेर, प्रतिनिधी | कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आणि पाठबळामुळे या ही वेळी मला प्रचंड मतांनी निवडून येण्याचा विश्वास आहे. आपणच पक्षाचे खरे आधारस्तंभ आहात आणि आपल्या माध्यमातूनच माझा विजय सुकर होणार आहे, असे प्रतिपादन ना.हरीभाऊ जावळे यांनी आज (दि.२३) येथे केले. येथील अग्रवाल भवनात आयोजित मतदार संघातील भाजपच्या बूथ प्रमुख, पेज प्रमुख, गण प्रमुख आणि शक्तीकेंद्र प्रमुख यांच्या बैठकीत ते बोलत होते.

 

यावेळी माजी जि.प. सदस्य सुरेश धनके म्हणाले की, हरीभाऊ जावळे यांच्या माध्यमातून रावेर मतदारसंघात प्रचंड विकास कामे झाली आहेत. तालूक्यात असे एकही गाव नाही, जिथे विकास काम झालेले नाही. फक्त आता झालेली काम जनतेपर्यंत पोहचवणे, आपली जबाबदारी आहे. तेव्हा आपला बुथ प्रत्येकाने मजबूत केला पाहिजे.

या बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदू महाजन, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद वायकोळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य हिरालाल चौधरी, तालुका अध्यक्ष सुनील पाटील, सरचिटणीस वासु नरवाडे, प.स.सद्स्य पी.के. महाजन, जुम्मा तडवी, संदीप सावळे, प्रल्हाद पाटील, भाजप शहराध्यक्ष मनोज श्रावक, रवी पाटील, प्रफुल्ल जवरे आणि रावेर तालुक्यातील सर्व बूथ प्रमुख, पेज प्रमुख, गण प्रमुख आणि शक्तीकेंद्र प्रमुख उपस्थित होते.

Exit mobile version