Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरात महिलांचे कायदेविषयक हक्क व अधिकार जनजागृती कार्यशाळा

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित यशस्विनी सामाजिक अभियानांतर्गत  सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली, महिलांचे कायदेविषयक हक्क व अधिकार जनजागृती सत्र या विषयास अनुसरून कार्यशाळेचे आयोजन अमळनेर येथे करण्यात आले होते. ॲड. तिलोत्तमा पाटील व ॲड. भारती अग्रवाल यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. महिलांसाठी असलेले विविध कायदे, घटना, कलम यांविषयी सविस्तर माहिती महिलांना सांगण्यात आली.

महिलांमार्फत बचत गटाअंतर्गत उत्पादित करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांचे स्टाॅल लावण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष स्थानी यशस्विनी सामाजिक अभियान जिल्हा समन्वयक सौ. तिलोत्तमा पाटील, तसेच यशवंतराव चव्हाण सेंटरच्या समन्वयक पल्लवी वाघ, डाॅ. अपर्णा मुठे, पद्मजा पाटील, भारती गाला, शितल सावंत, विजया देसर्डा, विद्या हजारे, माधुरी पाटील, रत्ना भदाणे, प्रिया रजाळे, मोहिनी सोनार, सुरेखा खैरनार, पुजा पाटील, विजया पाटील, फरिदा बोहरी, विद्या पाटील, प्रतिभा पाटील, आरती रेझा, उर्मिला अग्रवाल, सुनीता करंजे, योगिता पांडे, मनीषा भांडारकर व महिला भगिनी उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मजा पाटील यांनी केले.

Exit mobile version