Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

थोरगव्हाण येथे दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील थोरगव्हाण येथील ग्रामसभेत गावात सुरु असलेल्या अवैध दारु विक्री कायम स्वरुपी बंद करण्याचा ठराव करीत सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्यं, पोलिस पाटील व गावातील महिलां व पुरुष यांनी थेट दारु विक्रेत्याच्या घरासमोरुन जावून दारु बंद करण्याची मागणी केली आहे.

थोरगव्हाण ता. यावल ग्रामपंचायतची ग्रामसभा बुधवारी आयोजित करण्यात आली होती या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मनिषा समाधान सोनवणे या होत्या.ग्रामसभेत ग्रामसेवक भरत पाटील यांनी अंजेडा वरील विषय उपस्थित ग्रामस्थ व महिलांना वाचून दाखविले. तर गावात अवैद्य पणे हातभट्टी ची दारु व देशी विदेशी दारु विक्री होत आहे व पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. दारू मुळे गावात अनेकांची घरे उदव्धस्त होत आहे. तर काही कीरकोळ वाद होऊन शांतता भंग होत असते. तेव्हा या ग्रामसभेत संतप्त महिलांनी गावात कायम स्वरूपी दारु बंदी करण्यात यावी अशी मागणी केली.

याप्रसंगी सरपंच मनिषा सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. तसेच सतंप्त महिलांनी निवेदन देवून थेट दारु विक्रेत्याच्या घरी मोर्चा नेला व समज देवून दारु विक्री तात्काळ बंद करा अन्यथा आम्ही पोलिस स्टेशला जावुन कारवाईची मागणी करु अशी तंबी दिली. आज शांततेत मोर्चा काढुन समज दिली आहे जर दारू बंद केली नाही तर मोठा उद्रेक होईल असा इशारा महिलांनी दिला गावात चार ठिकाणी अवैद्य हातभट्टीची पन्नीतील दारु व देशी, विदेशी दारु राजरोजपणे विक्री होते या सर्वांनाचं महिलांनी समज दिली.महिलांनी अशा प्रकारे दारू बंदी विरूध्द भुमीका घेतल्याने अवैद्य दारू विक्री करणार्‍यामध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान, थोगरव्हाण येथील महीला व नागरीकांनी यावल पोलिस ठाण्यात ग्रामपंचायत कडून करण्यात आलेला दारू बंदीचा ठराव सह गावातील अवैद्य दारू विक्री करणार्‍यांवर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन दिले आहे. गावात अवैद्य दारू विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल असे निवेदन स्विकारल्यनंतर पोलिस उपनिरिक्षक सुनिल मोरे यांनी सांगीतले आहे.

दरम्यान यावल तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन ग्रामसभा घेवुन थेट ठराव घेवुन दारू बंद करावी अशी मागणी करण्यात आली असुन , पोलीस प्रशासनाकडून यासंदर्भात अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने ग्रामस्थ प्रशासनाच्या कारभारावर महीलांमध्ये मोठी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version