Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एरंडोल नगरपालिकेतर्फे महिला दिवस साजरा

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल नगर पालिकेतर्फे महिला नगरसेवक तसेच महिला कर्मचारी यांचा सत्कार व सन्मान करून जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला.

सर्व महिलांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.त्यानंतर उपस्थितांना नगरसेविका जयश्री पाटील,वर्षा शिंदे,आरती महाजन,सुरेखा चौधरी,बानोबी बागवान यांनी मार्गदर्शन केले.तसेच नगर पालिकेतर्फे  मुख्याधिकारी किरण देशमुख,कुसुम पाटील यांनी मार्गदर्शन केले.लोकनियुक्त अध्यक्ष रमेशसिंग परदेशी यांच्या भाषणाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.कार्यक्रमाचे वेळी महिला दिनाची संकल्पना असलेला केक कापण्यात आला. याप्रसंगी प्रियंका जैन, यामिनी जटे, सौ.पुराणिक, कुसुम पाटील, छाया देवरे, कल्पना सूर्यवंशी, रेखा महाजन होत्या.

 

Exit mobile version