Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

साळवा येथे महिला शेतकरी मेळावा उत्साहात

धरणगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील साळवा येथे महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात त्यांना विविध विषयांवर  मार्गदर्शन करण्यात आले.

 

साळवा येथे  सेवा संस्थेच्या वतीने महिला शेतकरी मेळावा घेण्यात आला.  या कार्यक्रमासाठी सेवा संस्थेचे धरणगाव येथील प्रकल्प समन्वयक महेंद्रसिंह रावल, शैलेश मांडे, कृषी विशेषज्ञ आशिष शहारे, लेखापाल ममता पाटील, कृषीसखी सिमा नेहेते, लिना कोल्हे आदी उपस्थित होते. प्रकल्प समन्वयक महेंद्रसिंह रावल यांनी सेवा संस्था राबवत असलेला PSCP प्रकल्पा विषयी महिला शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. कापूस पिकातील मुख्य समस्या व अडचणी याबाबत माहिती दिली. तसेच सेवा संस्थे विषयी माहिती दिली.

Exit mobile version