Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लाच म्हणून शरीर सुखासाठी तरुणींची मागणी ; दोन पोलिस निलंबित

Nagpur Police

 

नागपूर (वृत्तसंस्था) लाच म्हणून पोलिसांनीच शरीरसुखासाठी तीन तरुणींची मागणी केल्या प्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर, पोलिस आयुक्तांनी गुन्हे शाखेची सामाजिक सुरक्षा शाखाच बरखास्त केली आहे.

 

नागपूरमध्ये एक महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती बुधवारी नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली होती. त्यानुसार धाड टाकण्यासाठी गेलेल्या नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकातील पोलिस उपनिरीक्षक दामोदर राजुरकर आणि पोलिस हवालदार शीतलाप्रसाद मिश्रा या दोघांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेकडून शरीर सुखासाठी तीन तरुणी आणि ३५ हजार रुपयांची मागणी केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागपूर पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेत दोघं पोलिसांना निलंबित करत सामाजिक सुरक्षा पथकच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. उर्वरित पोलिस कर्मचाऱ्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.

Exit mobile version