Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिला आणि बालविकास मंत्री ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा

अमरावती – काँग्रेसच्या आघाडीच्या नेत्या आणि महाविकास आघाडी सरकारमधील महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.  आठ वर्षांपूर्वीच्या एका खटल्याचा निकाल देताना न्यायालयानेयशोमती ठाकूर यांना ही शिक्षा सुनावली आहे.

आठ वर्षांपूर्वी २४ मार्च २०१२ रोजी अमरावतीमधील अंबादेवी मंदिराजवळ यशोमती ठाकूर आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. दरम्यान, पोलिस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्यासोबत वाद घालून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करणे आणि शासकीय कामकाजात अडथळा आणणे, याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.  

या प्रकरणामध्ये यशोमती ठाकूर यांचा कारचालक आमि त्यांच्यासोबत असलेले दोन कार्यकर्ते दोषी आढळले आहेत. त्याबरोबरच फितूर होऊन साक्ष देणारा एक पोलीसही शिक्षेस पात्र ठरला आहे.

Exit mobile version