Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

म्हसावद येथे वाहनाच्या धडकेत महिला जखमी; गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथील महिला पायी जात असतांना भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्याने पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वाहन चालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, अलकाबाई डिगंबर उशीर (वय-५०) रा. बोरणार ता.जि. जळगाव ह्या आपल्या कुटुंबियांसह राहतात. अलकाबाई उशीर ह्या २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता कामाच्या निमित्ताने रस्त्याने गिरणी नदीच्या पुलाजवळ पायी जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणारे (एमपी ०९ बीडी ६९२७) वाहनाने धडक दिली. या धडकेत महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी  जळगावात खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. आलकाबाई उशीर यांच्या जबाबावरून गुरूवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक स्वप्निल पाटील करीत आहे.

 

Exit mobile version