Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गांजाच्या नशेत महिलेस मारहाण

injured woman mohrala यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मोहराळा येथे एका ६० वर्षीय वृध्देला गांजाच्या नशेत असणार्‍या माणसाने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली.

याबाबत वृत्त असे की, शनिवारी दुपारी सबनुरबाई बाबु नहाड (वय ६० रा. मोहराळा) या महिलेने गांज्याच्या नशेत गावात शिविगाळ करणार्‍या राजु नामदार नहाड यांस कुणाला शिव्या देतोय ? असे विचारले असता त्याने लोंखडी पाईप त्यांच्या डाव्या हातावर जबर वार केला. त्यात ही महिला जखमी झाल्या त्यांच्यावर यावल रूग्णालयात मंजुषा कोळेकर, वाय. डी. चौधरी यांनी उपचार करून जळगाव हलवण्यात आलेे आहे. या बाबत पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.

Exit mobile version