Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यूत कॉलनीत अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला जखमी

जळगाव प्रतिनिधी । खंडेराव नगरात राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेला अज्ञात वाहनाने जोरदार धडक देवून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, गंगाबाई श्याम मोरे (वय-४५) रा. खंडेराव नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २६ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास या महिला कामानिमित्त खंडेराव नगर येथून विद्यूत कॉलनी परिसरातून पायी जात होत्या. त्यावेळी एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी जखमी महिलेचा मुलगा योगेश श्याम मोरे यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विनोद सोनवणे करीत आहे.

 

 

Exit mobile version