Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भीषण अपघातात दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पाळधी गावाजवळील पोखरी तांडा फाट्याजवळ पुढे जात असलेल्या दुचाकीला अज्ञात दुचाकीने जोरदार धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती.

या घटनेबाबत महिन्याभरानंतर शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीसात अज्ञात दुचाकीवरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. झामाबाई काशिनाथ महाजन रा. तामसवाडी ता.पारोळा असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, दिलीप भिकन माळी (वय-४३) रा. तामसवाडी ता.पारोळा हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. १५ सप्टेंबर रोजी दिलीप माळी हे आपली आत्या झामाबाई काशिनाथ महाजन रा. तामसवाडी ता.पारोळा यांच्यासोबत दुचाकीने जळगाव शहरात येत असतांना सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळील पोखरी तांडा फाट्याजवळ  त्यांच्या मागून येणारी दुचाकीने जोरदार धडक दिली.

या धडकेत झामाबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दिलीप माळी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. दरम्यान, उपचारा घेतलल्यानंतर महिन्याभरानंतर शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता दिलीप माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उमेश भालेराव करीत आहे.

Exit mobile version