Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विज कोसळल्याने महिलेचा मृत्यु ; विवरे खुर्द येथील घटना

रावेर प्रतिनिधी । आज दुपारच्या सुमारास विवरे खुर्द (ता. रावेर) येथे विजेच्या धक्क्याने एका २५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिची दोन वर्षांची मुलगी जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, आज दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडात पावसाला सुरुवात झाली विवरे खुर्द शेती शिवार मध्ये राजू पाटील यांच्या शेतात मजूरी करणारे वागले कुटुंब मजूरी करत होते.अचानक वातावरणात प्रचंड बदल होऊन विजा कडकड्याला लागले व  मयत मुर्खी इडा वागले (वय २५) हीच्यावर विज पडून तिचा जागेच मृत्यु झाला तर तिच्या दोन वर्षीय रवीना किरकोळ जखमी झाली आहे.यामुळे वागले कुटुंबावर नैसर्गिक संकट कोसळलेले असून हातमजूरी करणारी महिलेचा यात मृत्यु झाला आहे. दरम्यान मुर्खी वागले (वय २५)  इडा वागले (वय ३०) हे आपल्या चार मुलां सोबत शेतातच राहून मजूरी करून उदारनिर्वाह करतात त्यांना राहुल (वय ४ ), रवीना (वय २) सह चार मुले आहे. आज दुपारी पडलेल्या विजमुळे चार मुलांची आई कायमची निघुन गेली आहे.

 

 

 

 

 

 

Exit mobile version