Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्कार्फने घेतला महिलेचा बळी; दुचाकीच्या चाकात अडकल्याने दुदैवी मृत्यू

यावल प्रतिनिधी । चितोड ते यावल रस्त्यावर दुचाकीच्या मागच्या चाकात स्कार्फ अडकल्याने झालेल्या अपघातात महिलेचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. 

कल्पना अनिल सोनवणे (वय-३९) रा. यावल असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, अनिल लिलाधार सोनवणे रा.व्यास नगर, यावल हे आपल्या पत्नी कल्पना अनिल सोनवणे (वय-३९) ह्या तालुक्यातील डोंगरकठोरा येथील उपप्राथमिक आरोग्य केंद्रात मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. आज सोमवारी २ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने पती अनिल सोनवणे यांच्यासोबत (एमएच १९ बीएच ५८६५) ने कामावरून यावल येथे येत असतांना चितोडा-यावल गावादरम्यानच्या रस्त्यावर त्यांच्या गळ्यातील स्कार्प अचानक दुचाकीच्या मागच्या चाकात अडकला. त्यामुळे कल्पना सोनवणे ह्या जमीनवर पडल्या. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी यावल ग्रामीण रूग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी. बारेला यांनी मयत घोषीत केले.  

मयत पावलेल्या कल्पना सोनवणे आणी त्यांचे पती अनिल सोनवणे हे दोघ ही डोंगर कठोरा येथे मागील दहा वर्षापासुन शासकीय नोकरीस आहेत. त्यामुळे दोघे पतीपत्नी नियमित डोंगरकठोरा ते यावल आपल्या दुचाकी वाहनाने ये जा करत होते.  अपघाताचे वृत्त कळताच माजी जिल्हा परिषद हर्षल पाटील, सामाजीक कार्यकर्ते सलीम तडवी, भाजपा उदय बाविस्कर, पिन्टु राणे, डोंगरकठोरा सरपंच नवाज तडवी, उपसपंचन धनराज पाटील, नितीन भिरूड आदी रुग्णालयात मदतीसाठी धाव घेतली.

Exit mobile version