खंडेराव नगरात महिलेला लोखंडी पाईपाने मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बकऱ्या बांधण्याच्या जागेवरून महिलेला लोखंडी पाईपाने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नसरिनबी खान (वय-३०) रा. खंडेराव नगर जळगाव ह्या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. धान्यविक्री करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. मंगळवारी २१ जून रोजी सकाळी ११ वाजता नसरिनबी ह्या त्यांच्या बाकऱ्या बांधत असतांना बांधण्याच्या जागेवरून लाला नागो कुंभर, नवल कुंभार, रूपा नागो कुंभार, हीरा नागो कुंभार सर्व रा. खंडेराव नगर यांनी महिलेला शिवीगाळ करून मारहाण करण्या सुरूवात केली. तर नवल कुंभार याने हातातील लोखंडी पाईप महिलेच्या डोक्यात मारून दुखापत केली. चौघांनी महिलेला जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून  लाला नागो कुंभर, नवल कुंभार, रूपा नागो कुंभार, हीरा नागो कुंभार सर्व रा. खंडेराव नगर मंगळवारी २१ जून रोजी दुपारी ३ वाता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विनोद सुर्यवंशी करीत आहे.

 

Protected Content