Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उसनवारीचे पैसे मागितल्यावरून महिलेला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उसनवारीने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून महिलेला झाडाच्या फांदीने मारून दुखापत केल्याची घटना शहरातील आर.आर.विद्यालयाजवळ घडली. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जुबेदा अब्दुल गफ्फार मन्सूरी (वय-४५) रा. लक्ष्मीनगर, आव्हाणे रोड जळगाव या महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी शरीफ लोहार रा. गेंदालाल मिल, जळगाव याला हातउसनवारीने पैसे दिले होते. उसनवारीचे पैसे अनेकवेळा महिलेने मागितले. परंतू पैसे देण्यास शरीफ लोहार हा टाळाटाळ करीत होता. बुधवार ६ जुलै  रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास महिलेने शरीफ लोहार याला आर.आर. विद्यालयाजवळ गाठले व उसनवारीने दिलेले पैशांची मागणी केली. या कारणावरून शरीफ लोहार याने रस्त्यावर पडलेली झाडाची फांदी महिलेच्या कपाळावर मारून दुखापत केली. याबाबत महिलेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शरीफ लोहार याच्या विरोधात रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रूस्तम तडवी करीत आहे.

Exit mobile version