Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेंदुर्णीकरांच्या मदतीने भारावले कोरोना काळातील खरेखुरे नायक आमदार !

शेंदुर्णी, ता. जामनेर, विलास पाटील । कोरोनाच्या रूग्णांसाठी तब्बल दीड हजार खाटांचे मोफत कोविड केअर सेंटर चालवून जनतेच्या गळ्यातील ताईत बनलेले आमदार निलेश लंके यांना शेंदुर्णी येथून डॉ. सागर गरूड आणि संजय गरूड यांनी भरघोस मदत पाठविली. यामुळे आमदार लंके अक्षरश: भारावल्याचे दिसून आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की डॉ. सागर गरुड कोरोना काळात जामनेर व पाचोरा तालुक्यात आरोग्य सेवा पुरवीत आहेत. त्याच बरोबर सामाजिक जबाबदारी चे भान ठेवत दोन्ही तालुक्यात अन्नधान्य, कोवीड सेंटर मध्ये मोफत जेवणाचे डबे पुरवीत आहे .परंतु त्यांना जेव्हा माहित पडले की पारनेर तालुक्यातील बाळवणी या छोट्याशा गावात तब्बल पंधराशे बेड असलेले को बीड सेंटर मोफत चालवण्यात येत आहे. तेथील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातील आहे. त्यामुळे त्यांनी केलेले शिवधनुष्य त्यांना सहज जावे या करिता डॉ सागर गरुड यांनी राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांचे सोबत चर्चा करून सागर दादा मित्र मंडळ व जामनेर तालुका राष्ट्रवादी यांचे सहकार्याने लागलीस तेथे फळे अन्न-धान्य गोळ्या-औषधे व सॅनिटायझर पाठविण्यात आली.

या सामग्रीत एक क्विंटल चिकू ,एक क्विंटल आंबे, दोन क्विंटल टरबूज, एक क्विंटल केळी ,दोन क्विंटल गहू ,शंभर किलो तेल, १००० सॅनिटायझर बॉटल, १००० मास्क ,५० किलो फरसाण तसेच तीन हजार नग अंडी व इतर साहित्य असलेली गाडी कार्यकर्त्यांसह रवाना करण्यात आली.

कोणत्याही गोष्टीचा गाजावाजा न करता कोविंड सेंटरला आलेली एवढी मोठी रसद पाहुन कोविड सेंटर चालविणारे व रुग्ण ही भारावून गेले. वाहनांसोबत कोवाड सेंटरला  भैय्या सुर्वे,दत्ता साबळे, सागर कुमावत ,निलेश वाघ, शुभम मोगरे, शेखर बावस्कर, राहुल राजपूत, गणेश पाटील यांनी जाऊन सदर रसद पोहोचविली. या मदतीमुळे आमदार निलेश लंके यांनी गरूड यांचे आभार मानले आहेत.

 

Exit mobile version