Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्थायी सभापतींच्या प्रयत्नांनी १५ हजार चौरस फुटाचा भूखंड मनपाच्या ताब्यात

जळगाव, प्रतिनिधी | शहरात महापालिकेचे खुले भूखंड सामाजिक संस्थाना विकसित करण्यासाठी देण्यात आलेले आहेत. यात काही संस्थांना देवून त्यांनी हे भूखंड अनेक वर्ष होऊन ही विकसित केले नसल्याने असे भुखंड ताब्यात घेण्यासाठी जागा मालकांना नोटीस महापालिने दिल्या होत्या. सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर शनिवारी रेडक्रॉस सोसायटीच्या मागील बाजूला असलेला १५ हजार चौरस फुटाचा भूखंड महापालिकेने आज ताब्यात घेतला.

नवीन बी. जे. मार्केटच्या शेजारी रेडक्रॉस सोसायटीच्या मागील बाजूला असलेला भूखंड क्रमांक १६७ ब हा १५ हजार २०० चौ.फुटाचा भूखंड क्रमांक तत्कालीन न.पा.ने आठवडे बाजारासाठी खरेदी केला होता. परंतु तत्कालीन न.पा.ने हा भूखंड नर्सिंग असोसिएशनला ९९ वर्षाच्या कराराने दिला होता. अशी कोणतीही संस्था धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी केलेली नसल्याचे निर्दशनास आले होते. त्यामुळे सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर ८१ “ब’ ची कारवाई करून शनिवारी महापालिकेने आज ही जागा ताब्यात घेतली. यावेळी महापौर सिमा भोळे व स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा उपस्थितीत होते. तसेच अतुलसिंह हाडा, मनोज (पिंटू) काळे, महापालिकेचे मिळकत व्यवस्थापक राजेंद्र पाटील, नगररचना विभागाचे सुहास चौधरी, शकील शेख, शाखा अभियंता प्रसाद पुराणीक आदी उपस्थित होते. स्थायी समिती सभापती ऍड. शुचिता हाडा यांनी २० जून २०१९ ला या जागेबाबत मनपा प्रशासनाकडे पत्र दिले होते. त्याचा पाठपुरावा केल्यानंतर सदर जागा महापालिकेच्या मालकीची असल्याचे निर्देशनास आले होते. त्यानुसार आज महापालिका प्रशासनाने ती जागा ताब्यात घेतली.

Exit mobile version