Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विप्रो सामूहिक बलात्कार प्रकरणी दोषी अर्ज रद्द

Bombay High Court

मुंबई प्रतिनिधी । पुण्यातील बीपीओ कर्मचारी महिलेवरील सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणी दोघांना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयानं आज रद्द केली असून त्यांची फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करण्यात आले आहे. राज्य सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

न्या. भूषण धर्माधिकारी व न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठानं या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावरील राखून ठेवलेला निकाल आज जाहीर करण्यात आला. न्यायालयानं दोन्ही आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून तिचे जन्मठेपेत रूपांतर केले. या दोघांना आता ३५ वर्षांची जन्मठेप भोगावी लागणार आहे. याबाबत माहिती अशी की, १ नोव्हेंबर २००७ रोजी ज्योती चौधरी ही कंपनीच्या कंत्राटावरील वाहनातून नाइट ड्युटीसाठी जात असतांना कारचालक पुरुषोत्तम बोराटे व त्याचा साथीदार प्रदीप कोकाटे यांनी कार निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर ओढणीने तिची गळा आवळून हत्या करतांना ओळख पटू नये, यासाठी तिचा चेहराही विद्रुप केला होता. या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने मार्च-२०१२ मध्ये या दोघांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले होते. शिवाय राज्यपाल व राष्ट्रपतींनी त्यांच्या दया याचिकाही फेटाळल्या होत्या. त्यानंतर पुणे सत्र न्यायालयाने यावर्षी १० एप्रिल रोजी वॉरंट काढून २४ जून ही फाशीची तारीख निश्चित केली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. त्याच आधारे आरोपींनी शिक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.

Exit mobile version