Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धनाजी नाना महाविद्यालयात हिवाळी शिबीर

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने हिवाळी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

करोना सारख्या भयंकर अशा महामारीनंतर हे सर्वप्रथम शिबिर ज्यात सर्व नियम पाळून शिबिर हे कार्यपूर्तीस येत आहेत. या दिव्य अशा शिबिरास भेट तथा मार्गदर्शन करण्यासाठी जेष्ठ व्याख्याते तथा अनुभव वांनी नटलेल्या व्यक्ती आपल्या वाणी तथा विचारांनी सुंदर असा आकार देण्याचे काम करत आहेत. त्याच प्रमाणे दि.26 मार्च रोजी सकाळी राष्ट्रीय सेवा योजना चे डायरेक्टर नाद्रे यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले. डॉ.राजेंद्र राजपूत यांनी सूत्रसंचालन कसे करावे नियोजन व कतीबद्दता यावर मार्गदर्शन केले. सोबत लेफ्टनंट पाटील यांनी देखील यशस्वी जीवनाचे रहस्य सांगितले. त्यानंतर स्वयंसेवक यांना सन्मानित करून मंच माजी स्वयंसेवक यांच्या कडे सोपवण्यात आला. माजी स्वयंसेवक कुणाल मानकर यांनी आव्हान शिबिर तसेच विविध शिबिरांबद्दल माहिती सांगून प्रोत्साहित केले. माजी स्वयंसेवक राहुल फुकटे यांनी देखील मार्गदर्शन केले.

माजी स्वयंसेविका साक्षी पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजना नियम कटीबद्दता व चरित्र यावर मार्गदर्शन केले. माजी स्वयंसेविका लक्ष्मी बॉंडे यांनी राज्य स्तरीय शिबीराद्दल मार्गदर्शन केले. त्या नंतर उत्कृष्ट सिने कलाकार प्रोफेसर अनिल मगर यांनी आपल्या विविध अशा नाट्य शैली अर्थात गाळगेबाबा यांच्या परीवेशातून ग्राम स्वच्छ जागृती रॅली काढली व संदेश पर नाट्य सादर केले. स्वयंसेवकांनी देखील अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य तपासणी या सारख्या विषयावर पथनाट्य सादर केले आणि भारुडच्या कार्यक्रमांनी दिवसाची समाप्ती झाली. कार्यक्रमाची नियोजन कमिटी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुर्यवंशी, सहाय्यक अधिकारी डॉ. सरला तडवी, सहाय्यक अधिकारी पाडवी यांनी शिबीर यशवीतेसाठी अतोनात प्रयत्न केलेत.

 

Exit mobile version