Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुजबळांना शिवसेनेत प्रवेश देणार नाही – राऊत

2Rumour 20in 20Nashik 20about 20Chagan 20Bhujbal 20and 20Sanjay 20Raut 20Meeting

नाशिक, वृत्तसंस्था | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. येवला येथे ते बोलत होते. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरही मत मांडले. राणेंना भाजपमध्ये प्रवेश द्यावा किंवा नाही हा त्यांचा विषय आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाला आमचा विरोध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

येवला मतदारसंघातील शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. भुजबळ यांना पक्षात प्रवेश देऊ नये, अशी मागणी त्यांनी राऊत यांच्याकडे केली. त्यावर भुजबळ यांना शिवसेनेत घेणार नाही, असे स्पष्ट आश्वासन राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिले. मी आहे तिथे बरा आहे, असे भुजबळांनी काल सांगितल्याने त्यांच्या प्रवेशाबाबतचे चित्र स्पष्ट झाले आहे, असेही ते म्हणाले.

Exit mobile version