Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मलिक यांच्या कुटुंबाच्याही अडचणी वाढणार?

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मलिक यांच्या पत्नीसह दोन्ही मुलांना ईडीने चार्जशीटमध्ये चौकशीसाठी समन्स बजावूनही हजर राहिले नाहीत. यावरून मलिक यांच्या कुटुंबाच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक हे मनी लाँड्रिंग प्रकरणी २३ फेब्रुवारी पासून इडीच्या अटकेत आहेत. मलिक यांच्या पत्नी मेहजबीन यांना दोन वेळा तर मुलगा फराज मलिकला पाच वेळा मनी लाँड्रिंग प्रकरणी समन्स बजावण्यात आले. परंतु मलिक यांच्या पत्नीसह दोन्ही मुलांपैकी एकही जण चौकशीसाठी हजर राहिलेले नाहीत. मलिक यांचे डी गँगसोबत दीर्घ काळापासून संबंध असल्याचे तपासात सिद्ध झाल्याने ईडीतर्फे मंगळवारी विशेष पीएमएलए कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आली असल्याचे इडीतर्फे सांगण्यात आले आहे.
डी गँग अनेकांना धमकावत वादातील मालमत्ता बळकावण्यात आल्या. त्यातील पीडित मुनीरा प्लंबर यांची कुर्ला येथे तीन एकर जमीनीची किंमत ३०० कोटी रुपये असून ही जागा मलिक आणि हसिना पारकर यांनी बळकावल्याचा आरोप आहे. नवाब मलिक यांच्याशी संबंधित आठ मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने टाच आणली असून त्यात कुर्ला पश्चिम येथील गोवावाला कंपाऊंड, कुर्ला पश्चिम येथील व्यावसायिक मालमत्ता, तीन सदनिका, उस्मानाबाद येथील १४७ एकर जमीन, वांद्रे पश्चिम येथील दोन सदनिका तसेच उस्मानाबाद येथील मालमत्तांचा समावेश आहे. याशिवाय या मालमत्ता नवाब मलिक, त्यांचे कुटुंबिय, मे. सॉलिड्स इन्वेस्टमेंट प्रा. लि. व मे. मलिक इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या नावावर असून मे. सॉलिड्स इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. आणि मे. मलिक इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यामार्फत या मालमत्तांवर गोळा करण्यात आलेले ११ कोटी ७० लाख रुपयांचे भाडेही गुन्ह्यांतील उत्पन्न असल्याचे ईडीने म्हटले आहे.

Exit mobile version