Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माध्यमांविरोधात मानहानीचा दावा ठोकणार- पंकजा मुंडे

परळी- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसंस्था । राहुल गांधी व सोनिया गांधी यांना मी कधीही प्रत्यक्षात भेटले नसून “अलीकडे आलेल्या एका बातमीने मला अंर्तमुख केलं. त्यामुळे या माध्यमांविरोधात मानहानीचा दावा ठोकणार आहे. असे पंकजा मुंडेंनी म्हटलं.

गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच, पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचं बोललं जात होतं. या सर्व चर्चा पंकजा मुंडे यांनी फेटाळल्या आहेत. मी कधीही काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना प्रत्यक्षपणे भेटले किंवा पाहिलं नाही, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.

तसेच पुढे म्हणाल्या कि, “अलीकडे आलेल्या एका बातमीने मला अंर्तमुख केलं. त्यात मी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची दोनदा भेट घेतली. आणि मी काँग्रेसच्या वाटेवर आहे, असं सांगण्यात आलं. मी कधीही राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना प्रत्यक्षपणे भेटले किंवा पाहिलं नाही. कोणत्याही बातमीवर प्रश्नचिन्ह टाकून कायदेशीर प्रश्न सोडवू शकता. परंतु, माध्यमांनी कोणतीही बातमी देताना स्त्रोत देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या माध्यमांविरोधात मानहानीचा दावा ठोकणार आहे. त्यांनी केलेल्या कथनाचे पुरावे न्यायालयात सादर करावे लागतील. माझे करियर कवडीमोलाचे नाही,” असेही पंकजा मुंडेंनी म्हटलं.

Exit mobile version