Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘विकिलीक्स’चा संस्थापक असांजेला लंडनमध्ये अटक

images 1 3

लंडन (वृत्तसंस्था) अमेरिकेसह अन्य देशांची गोपनीय राजनैतिक व लष्करी कागदपत्रे उघड करून जगभरात खळबळ उडवून देणारा ‘विकिलीक्स’या पोर्टलचा संस्थापक ज्युलियन असांजे याला ब्रिटन पोलिसांनी आज अटक केली आहे. इक्वाडोर येथील दूतावासातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. ब्रिटन पोलिसांनी त्याच्या अटकेची माहिती जाहीर केली आहे.

 

राजनैतिक आणि लष्कराची गोपनीय कागदपत्रे उघड करणाऱ्या असांजेने अटकेच्या भीतीनं लंडनमधील इक्वाडोर दूतावासात आश्रय घेतला होता. २०१२ पासून तो त्या दूतावासात रहिवासाला होता. प्रत्यार्पण आणि अटकेच्या भीतीनं त्याने तेव्हापासून दूतावास सोडले नव्हते, अखेर आज त्याला ब्रिटन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ‘४७ वर्षीय असांजेला आज, मेट्रोपॉलिटन पोलिसांनी इक्वाडोर दूतावासातून अटक केली आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. इक्वाडोर सरकारनं आश्रय काढून घेतल्यानंतर त्याला दूतावासात बोलावण्यात आले होते. त्यानंतर ब्रिटन पोलिसांनी त्याला अटक केली, असेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, लैंगिक शोषणाच्या एका आरोपाखाली स्वीडनला हवा असलेल्या असांजेने प्रत्यार्पण टाळण्यासाठी दूतावासात आश्रय घेतला होता.

Exit mobile version