Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कौटुंबिक वादातून पोलीस कर्मचाऱ्याकडून पत्नीला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अथर्व नगर येथे कौटुंबिक वादातून पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याच्या पत्नीला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचारी विरुद्ध गुरुवार 27 जुलै रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल झाला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की अथर्व नगर येथे कविता हेमंत सोळुंखे वय ३५ या वास्तव्यास आहेत. बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास कविता सोळुंके यांना त्यांचे पोलीस कर्मचारी असलेले पती हेमंत सोळुंखे यांनी कौटुंबिक वादातून शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली.  तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कविता सोळुंखे यांनी गुरुवारी  रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून हेमंत सोळुंखे यांच्याविरुद्ध अदखल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख हे करीत आहेत.

Exit mobile version