Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कर नाही त्याला डर कशाला ? : सावंतांचा महाजनांना चिमटा

मुंबई प्रतिनिधी । गिरीश महाजन यांच्यावर राजकीय सूडासाठी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांना वाटत असेल तर कर नाही त्याला डर कशाला ? अशा भाजप नेत्यांच्या शब्दाची आठवण करून देत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी चिमटा काढला आहे.

खंडणी मागितल्याप्रकरणी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश महाजन यांनी आपल्यावरील आरोपांचे खंडन केले आहे.गुन्हा दाखल करणे हा राजकीय षडयंत्राचा भाग आहे, असे म्हणत त्यांनी या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.यावरूनच शिवसेनेने भाजपला त्यांच्याच एका विधानाची आठवण करून दिली आहे. कर नाही त्याला डर कशाला? असे म्हणत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी त्यांना चिमटा काढला आहे.

महाजनांवरील गुन्ह्याबाबत अरविंद सावंत म्हणाले की, ही पोलिसांची कारवाई आहे.गिरीश महाजन यांनी जर काही केले नाही.तसेच हा राजकीय षडयंत्राचा भाग असेल असे त्यांना वाटत असेल,तर त्यांनी घाबरून जाऊ नये ही पोलिसांची कारवाई असून त्याची चौकशी होणारच.कर नाही त्याला डर कशाला? हे आपल्याच नेत्यांचेच वाक्य महाजन यांनी लक्षात ठेवावे, असा खोचक टोला अरविंद सावंत यांनी लगावला.

 

Exit mobile version