Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उगाच कशाला पावसात भिजत भाषण करायचे- राज ठाकरे

पुणे, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | नेहमी किमान तासभर चालणाऱ्या सभांपेक्षा अत्यंत कमी वेळात, सध्या निवडणुका नाहीत न मग उगाच कशाला पावसात भिजत भाषण करायचे, त्यापेक्षा पुण्यातील गणेश क्रीडा मंदिरातली सभा घेतली असा अप्रत्यक्ष टोला देत सर्वाना गुंडाळत आजची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेतली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजी अयोध्या दौरा होता. पण प्रकृती अस्वाथामुळे राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर टाकला असल्याचे म्हटले होते. त्यापार्श्वभूमीवर आज पुण्यातील गणेश क्रीडा मंदिर येथील झालेल्या सभेत पूर्वीच्या मुंबई ठाणे औरंगाबादच्या सभांप्रमाणेच हिंदुत्व, भोंगे, संजय राऊत, राणा दाम्पत्य, ओवेसी, शिवसेनेचे मुख्यमंत्री यांच्यावर टीका केली.

हल्ली मैदान, हॉल ठरवणे काही परवडत नाही, सध्या निवडणुकाही नाहीत, उगाच कशाला पावसात भिजायचे म्हणून येथेच बरे म्हणून हि सभा घेतली. गेल्या सभेत पंतप्रधानांना विनंती केली होती कि, लवकरात लवकर समान नागरी कायदा आणावा. देशाच्या लोकसंख्या नियंत्रणासाठी अजून एक कायदा आणावा आणि औरंगाबादचे एकदाचे संभाजीनगर करून टाका. यांनी सतत हिंदुविरोधी बोललेच पाहिजे, त्यातूनच निजाम महाराष्ट्रात वळवल करत आहेत त्यांना यांनी आयते मैदानच दिले आहे. आणि आम्हाला तर अजिबातच लाज वाटत नाही. सत्ताधारी आणि आमच्या शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल, तर यावर बोलणेच नको, असेही ते म्हणाले.

मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठन करायला का मशिद वाटली का? असे म्हणत राणा दाम्पत्यावर देखील टीका केली. या सभेत मुख्यमंत्र्यांना लक्ष करीत औरंगाबादचे संभाजीनगर करायची गरजच काय? यावरून तुम्ही कोण सरदार पटेल कि गांधी असे म्हणत राज ठाकरेनी केलेली सगळी आंदोलने पूर्णत्वाला नेली आहेत. तुमच्यावर आंदोलन केल्याचा एकतरी गुन्हा दाखल आहे का? अशी टीकाही त्यांनी केली.

तर अयोध्येला येण्यापूर्वी माफी मागा, अशी मागणी उत्तर प्रदेशातील बृजभूषणसिंह यांनी केली,. गुजरात मधल्या अल्पेश ठाकूर यांनी उत्तर प्रदेश, बिहारच्या नागरिकांना अक्षरशा हाकलून दिले ते मुंबईत आले. इथे तर कोणीही येतो. मात्र माफी कोणाला मागणार, यांना भोंग्यावर, हिंदुत्व झोंबले हे राजकारण आपल्याला समजले पाहिजे, असे म्हणत अत्यंत कमी वेळात प्रकृतीच्या कारणामुळे सभा आटोपती घेतली.

 

 

 

 

 

 

 

Exit mobile version