पांढर्‍या सोन्याला झळाळी : पहिल्यांदाच मिळाला ‘इतका’ दर !

मुंबई प्रतिनिधी | कापूस उत्पादकांना बहुतांश प्रसंगी वाजवी भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत येत असतात. मात्र यंदा कापसाला वाढीव भाव मिळत असून आज यवतमाळ मध्ये तर भावाचा उच्चांक प्रस्थापित झाला आहे.

यंदा कापसाला समाधानकारक भाव मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कापसाचे दर सातत्याने वाढत आहेत.  सध्या कापूस दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील चार ठिकाणी कापसाच्या दराने दहा हजाराचा टप्पा ओलांडला. फुलसावंगी बाजारपेठेत कापसाला सर्वाधिक १० हजार ४००  रुपयांचा विक्रमी दर मिळाला. यवतमाळ, राळेगाव आणि वणी  बाजारपेठेतही कापसाचा दर दहा हजारांच्या ४४० रुपये क्विंटलहून अधिक झालाय. इतिहासात  पहिल्यांदाच कापसाला दहा हजारांहून अधिकचा दर मिळाला. बाजारपेठेत मागणी वाढली असतांना पुरवठा कमी झाल्यामुळे मागील कापसाचे दर वाढत आहेत. त्यातच सरकीचे दर २८०० रुपयांवरून चार हजार रुपये क्विंटलवर पोहोचल्याने बाजारपेठेत कापसाच्या दराने झेप घेतली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात एकाच दिवसात ३२ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. विशेष बाब म्हणजे कापसाचा हमीदर सहा हजार २५ रुपये असून खुल्या बाजारात कापसाचे दर यापेक्षा जास्त आहेत. यामुळे यंदा बळीराजाला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी सुखावले आहेत.

Protected Content