Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बसमध्ये चढतांना वृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र लांबविले

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा बसस्थानक आवारात बसमध्ये चढत असतांना वृध्द महिलेच्या गळ्यातील ५७ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंधुबाई छगन पाटील (वय-७५) रा. गणपूर ता.चोपडा या वृध्द महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास चोपडा येथून गणपूर गावात जाण्यासाठी चोपडा बसस्थानक आवारात आलेल्या होत्या. त्यावेळी चोपडा गणपूरच्या बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ५७ हजार रूपये‍ किंमतीचे मंगळसुत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले. गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला परंतू काहीही माहिती मिळाली नाही. म्हणून त्यांनी तातडीने चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ हरीष पवार करीत आहे.

Exit mobile version