Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बसमध्ये चढतांना महिलेचे दागिन्यांसह रोकड लांबविले

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेचे रोकडसह दागिने असा ७६ हजारांचा मुद्देमाल लांबविला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील वाकडी येथील रहिवासी सोजरबाई चतरसिंग राजपूत वय  ५९ या सोमवारी कामानिमित्ताने जळगावात आल्या होत्या. काम आटोपल्यानंतर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पुन्हा गावी जाण्यासाठी त्या नवीन बसस्थानकात आल्या. याठिकाणी जामनेकडे जाणार्‍या बसमध्ये चढत असतांना त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले ३८ ग्रॅमच्या  सोन्याच्या दोन पोत तसेच पाच हजार रुपये रोख असा ७६ हजारांचा ऐवज कुणीतरी चोरून नेला.  बसमध्ये बसल्यानंतर  आपले दागिने तसेच पैसे चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर  सोजरबाई राजपूत यांनी  बसमध्ये तसेच बसस्थानक परिसरात चौकशी करत शोध घेतला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Exit mobile version