कार्यकर्त्यांची धरपकड तर नियमभंग करणाऱ्यावर कारवाई केव्हा? राज ठाकरे

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – भोंग्या विरुद्ध हनुमान चालीसा पठण आंदोलन करणाऱ्याची धरपकड करवाई होत आहे. यावरून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार नियमभंग झालेल्या मशीदीवर कारवाई केव्हा कारवाई करणार ?, असा प्रश्न राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारला विचारला आहे.

मशिदीवरील भोंग्याचा विषय राजकीय नसून सामाजिक आहे. आज अनेक मौलवींनी भोंग्याविना अजान दिली, त्यांचे आभार मानतो, परंतु भोंगे हा विषय आज एका दिवसाचा नसून भोंगे जोपर्यंत खाली येत नाहीत तोपर्यंत हनुमान चालीसा सुरूच राहणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

संपूर्ण मुंबईत साडे अकराशेच्या जवळपास मशिदी आहेत, त्यापैकी बऱ्याच ठिकाणी भोंग्यावर अजान देण्यात आली. तर या माशिदींच्या प्रमुखांनी परवानगी घेतली आहे, परंतु या अधिकृत तरी आहेत का? यावरील भोंगे अनधिकृत असून त्याच्यावर केव्हा कारवाई करणार? सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार नियमांचा भंग झालेला नाही का? विशीष्ट डेसिबलपेक्षा मोठ्या आवाजात त्यांना भोंगे लावण्याची परवानगी नाही असे आवाहन केले पोलिसाकडून करण्यात आले आहे. तर पोलिस दररोज मशिदीवरील भोंग्याचे डेसिबल मोजणार आहेत का?  भोंग्याचा त्रास सकाळीच होनसून  दिवसभरात बऱ्याच वेळा त्रास होतो. तो कमी होण्यासाठी    भोंगे हे कायमचे उतरले गेलेच पाहिजेत, भोंगे उतरत नाहीत तोवर आमचे कार्यकर्ते  हनुमान चालीसा वाजवणार असल्याचेहि राज ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!