Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कारण नसतांना तरूणाला फायटरने मारहाण करून सोन्याची चैन व रोकड लांबविली

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील ख्रिश्चन कब्रस्थान परिसरात काहीही कारण नसतांना एका तरूणाला फायटरने मारहाण करून गंभीर दुखापत करून गळ्यातील सोन्याची चैन व दीड हजार रूपयांची रोकड जबरी काढून नेल्याची घटना शुक्रवारी २१ जून रोजी रात्री ८.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी शनीवारी २२ जून रोजी रात्री साडेबारा वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, सम्राट सुरेश बनसोडे वय ३४ रा. स्नेह नगर, भुसावळ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी २१ जून रोजी रात्री ८.३० वाजता सम्राट बनसोडे हा तरूण भुसावळ शहरातील ख्रिश्चन कब्रस्थानजवळ उभा होता. त्यावेळी विवेक शेकळे व आतिश खरात दोन्ही रा. भुसावळ हे दोन जण सम्राट जवळ गेले. व काहीही कारण नसतांना त्याला फायटरने बेदम मारहाण केली. या मारहाणीत सम्राटला जखमी करत त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन आणि खिश्यातील दीड हजारांची रोकड जबरी हिसकावून पसार झाले. याप्रकरणी शनिवारी २२ जून रोजी रात्री १२.३० वाजता तरूणाने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार विवेक शेकळे व आतिश खरात दोन्ही रा. भुसावळ या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार हे करीत आहे.

Exit mobile version