Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कारण नसतांना एकाच्या डोक्यात टाकला लाकडी दांडका

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिंप्राळा रोड परिसरातील जेडीसीसी बँक कॉलनीत एकाला काहीही कारण नसतांना लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा रोडवरील जेडीसीसी बँक कॉलनीत हेमंत मधुकर राजभोसले (वय-५४) हे वास्तव्याला आहे. ११ मे रोजी रात्री ९ वाजता हेमंत राजभोसले हे घरी असतांना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी येवून काहीही कारण नसतांना शिवीगाळ करून त्यांच्या डोक्यात लाकडी दांडका मारून गंभीर दुखापत केली. जखमीवस्थेत हेमंत राजभोसले यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर शुक्रवार १३ मे रोजी रात्री ९ वाजता पोलीसांनी घेतलेल्या जबाबावरून एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ फिरोज तडवी करीत आहे.

Exit mobile version