Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंचा ‘माफिया’ उल्लेख करताच शिंदे गटाने व्यक्त केली नाराजी

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्वीट करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ‘माफिया’ म्हणून उल्लेख केला असून यावर शिंदे गटातील आमदारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

 

याविषयी अधिक वृत्त असे की, “ भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज गुरुवार, दि. ७ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर सोमय्या यांनी मंत्रालयात आज रिक्षावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. माफिया मुख्यमंत्र्यांना हटविल्याबदल अभिनंदन केले. असे एक ट्वीट केले. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी, ”उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असा शब्द वापरणे आम्हाला मान्य असून अशा शब्दांचा वापर केला जाऊ नये.असे म्हटले यावर सोमय्या यांनी, ”अशा प्रकारची प्रतिक्रिया आपआपल्या पक्षाचे लोक देत असतात. यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. असे प्रत्युत्तर दिले.

पुढे सोमय्या म्हणाले की, ”मी एकनाथ शिंदे यांना भेटलो. त्यांचं कौतुक केलं. ज्या सरकारमधील काही लोकांच्या डोक्यात सत्तेचा माज गेला होता. ते सत्तेचा दुरुपयोग करत होते. ही एक प्रकारची माफियागिरी होती. मनसुख हिरेनची हत्या करण्यात आली. त्याचं कुटुंब हत्या करणाऱ्याला माफियाच म्हणणार.” 

यावर दीपक केसरकर म्हणाले की, ”आम्ही जेव्हा मुंबईत आलो त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याह सर्व आमदार आणि भाजपच्या नेत्यांची बैठक झाली. ज्याला देवेंद्र फडणवीस ही उपस्थित होते. त्या बैठकीत मला बोलण्याची संधी मिळाल्यावर मी विनंती केली होती की, आमचे नेते उद्धव ठाकरे किंवा कोणत्याही अन्य नेत्यांच्या बाबतीत वक्तव्य करण्यात येऊ नये. त्यांनी ती विनंती मान्य केली होती. त्यांनी स्वतः भाजप कार्यकर्त्यांना आपल्या भाषणातून सांगितलं होतं की, जे जेष्ठ नेते असतात, त्यांच्याशी राजकीय वाद होऊ शकतो. परंतु कोणीही त्यांच्याबद्दल काहीही वक्तव्य करू नये. असं त्यांनी स्पष्ट सागितलं होतं.

आज जे घडलं त्याबद्दल आमचं जे ठरलं होतं ते आम्ही फडणवीस यांना सांगू. सोमय्या हे भाजप नेते आहेत, त्यांना फडणवीस काय ते सांगतील. हे जे घडलं आहे, ते आम्हाला कोणालाही आवडलं असल्याचं केसरकर यांनी सांगितलं. 

Exit mobile version