Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खडसेंचे भाषण सुरू असतांनाच खेचला माईक : सभेस्थळी खळबळ

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे सुरू असलेल्या सभेत एका कार्यकर्त्यांना एकनाथराव खडसे यांचे भाषण सुरू असतांना त्यांच्याकडून माईक खेचण्याचा प्रयत्न केल्याने सभेस्थळी खळबळ उडाल्याचे दिसून आले.

या संदर्भातील वृत्त असे की, जामनेर येथे काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी एकनाथ खडसेंनी भाषण करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांची नावे घेतली. यासाठी खडसे यांच्या हातात एक चिठ्ठीही होती. त्यानुसार ते मान्यवरांची नावे घेत होते. मात्र त्याचवेळी गर्दीतून अचानक एक कार्यकर्ता थेट उठला व त्याने बोलत असलेल्या एकनाथ खडसेंच्या हातातून माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला.

या प्रकारामुळे सभेत काही काळ गोंधळ उडाला. मात्र त्या कार्यकर्त्याला बाजूला नेऊन शांत करण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र तो कार्यकर्ता लवकरच शांत न होता मोठ्या-मोठ्याने बोलत असल्याचे दिसून आले. यानंतर खडसे यांनी आपले भाषण पुढे सुरू ठेवले. या प्रकाराची राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे.

Exit mobile version