Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

व्हाटसअ‍ॅप डाऊन : युजर्स वैतागले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज दुपार व्हाटसअ‍ॅप मॅसेंजर डाऊन झाल्याने जगभरातील या ऍपचे युजर्स त्रस्त झाले असून यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

सध्या भारतात दिवाळीचे पर्व सुरू असल्याने साहजीकच सोशल मीडियातही याचे प्रतिबिंब उमटले आहे. अर्थात, सोशल मीडियावर लोक जास्त वेळ व्यतीत करत आहेत. यात भारतीयांची पहिली पसंत असणार्‍या व्हाटसअ‍ॅपवर लोकांचा वेळ जास्त प्रमाणात जात आहे. यातच दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास व्हाटसअ‍ॅप डाऊन झाल्याने हलकल्लोळ उडाला आहे.

व्हाटसऍपची मूळ कंपनी असणार्‍या मेटाने आपले मॅसेंजर डाऊन झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून आधीप्रमाणेच सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र जवळपास एक तास उलटूनही व्हाटसअ‍ॅप डाऊन असल्याने युजर्स वैतागल्याचे दिसून येत आहेत. तर यामुळे लोक ट्विटर आणि फेसबुकवरून मोठ्या प्रमाणात धमाल मीम्स देखील शेअर करत आहेत.

Exit mobile version