Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यात त्या थडग्याची गरज काय? जमीनदोस्त करा- मनसेची मागणी

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | एमआयएमच्या अनेक नेत्यांनी खुल्ताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन प्रकरणावरुन अनेक वाद निर्माण झाले असून शिवरायांच्या राज्यात औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय? यांच्या नतमस्तक होण्यासाठी हे थडगं ठेवले आहे का?,” असा प्रश्न मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी उपस्थित करीत ते हटविण्याची मागणी केली आहे.

एमआयएमच्या अकबरोद्दीन औवेसी, खा. इम्तियाज जलील, वारीस पठाण यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह खुलताबादच्या औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले. या  प्रकरणावरुन सत्ताधारी, विरोधी पक्ष भाजपासह सर्वच प्रमुख पक्षांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.  संभाजीनगर पासून जवळच खुल्ताबाद येथिल औरंगजेबाचं थडगं जमीनदोस्त झाले पाहिजे. आणि ते पुन्हा बांधण्यात येऊ नये. अशी बाळासाहेबांची मुलाखत १८ डिसेंबर २००० रोजी ‘सामना’ त मुलाखत  होती. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना संस्थापक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या त्याच मुलाखतीचा संदर्भ देत ही मागणी मनसेकडून हि मागणी करण्यात आली आहे.

तसेच शिवसेनेवर निशाणा साधताना संभाजीनगरचे नामकरण, रस्त्यावरील नमाज, भोंग्यांसंदर्भातील भूमिका अशा अनेक गोष्टींवरुन पलटी मारली असून, असली नकलीच्या गप्पा मारणाऱ्या हिंदुत्ववाद्यांनी आता आपला चेहरा दाखवूनच द्यावा. किमान बाळासाहेबांचं हे ऐकून या शिवरायांच्या राज्यात औरंगजेबाचे हे थडगं आपण कधी तोडणार आहात? औरंगजेबाच्या या थडग्याची गरज काय? ही निजामाची औलाद या थडग्यावर नतमस्तक होण्यासाठी हे ठेवले आहे का? औवेसींचा उल्लेख टाळत मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी असे प्रश्न थेट उपस्थित केले आहेत.

Exit mobile version