Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चित्ररथ नाही, यात मोदींचा दोष काय ? : राज्य भाजपाचा सवाल

bjp

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ नाही, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोष काय ? असा प्रश्न आता भाजपाने टीकाकारांना विचारला आहे. भाजपा महाराष्ट्राने काही ट्विट करुन टीकाकारांना हा प्रश्न विचारला आहे. महाराष्ट्राला यापूर्वी १९७२, १९८७, १९८९, १९९६, २०००, २००५, २००८, २०१३, २०१६ या वर्षांमध्येही प्रतिनिधीत्व नव्हते. दोन अपवाद वगळले तर केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचेच सरकार होते. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल यांना वगळले अशी टीका आत्ताच का होते आहे ? असा प्रश्न भाजपाने विचारला आहे.

 

दरवर्षी ३२ राज्यांकडून प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथासाठी प्रवेशिका मागवल्या जातात. त्यापैकी १६ राज्यांची निवड होते. केंद्र सरकारची आठ मंत्रालये असे २४ चित्ररथ असतात. वेगवेगळ्या राज्यांना प्रतिनिधीत्व मिळावे म्हणून रोटेशन पद्धतीने निवड केली जाते. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या सोहळ्यात महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचा चित्ररथ नाही म्हणून काही लोक लगेच टीका करत आहेत. विरोधकांची सरकारे असलेल्या राज्यांना वगळले म्हणून ओरड केली जाते आहे. अर्थात वस्तुस्थिती त्यांना सोयीस्करपणे जाणून घ्यायची नसेल, असे म्हणत भाजपाने सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

Exit mobile version